आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-वडूज नगरीत डॉ आंबेडकर जयंती निम्मित इफ्तार पार्टीत जय भिम,, जय मिम चा बुलंद नारा,,,,

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

वडूज नगरीत डॉ आंबेडकर जयंती निम्मित इफ्तार पार्टीत जय भिम,, जय मिम चा बुलंद नारा,,,,

वडूज दि:
वंचित बहुजन आघाडी वडूज शहर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी चे नियोजन केले. यावेळी जय भिम,, जय मिम चा नारा देण्यात आला.दलित- मुस्लिम समाजाची नाळ कधी तुटू शकत नाही असे मुस्लिम युवा नेते इम्रान बागवान व वंचित बहुजन आघाडी युवा नेते तुषार बैले यांनी केले. तसेच एकमेकांना मिठाई चारून भाई चारा दाखवून दिला.
सध्या देशात जातीयवादी पक्ष महागाई, बेरोजगारी बद्दल ‘ब्र ‘शब्द काढत नाही. याउलट सत्ताधारी पक्ष धर्म पुढे आणत आहेत. आज हिंदू बांधव सुद्धा महागाई ने त्रस्त आहेत.
ह्या देशाला डॅा.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालवायचं प्रामाणिक काम हे पूर्वीपासून राष्ट्रीय कॅाग्रेस पक्षानेच केले आहे.
आज देशात संविधानाचा विचार होत नाही. ह्या देशातून संविधान संपवण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे चालू आहे. त्याला छेद देण्याचे काम मुस्लिम व दलित बांधव करू शकतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त रमजान रोजा इफ्तार पार्टीचे वंचित बहुजन समाजातील बांधवांनी केले आहे. ही चांगली बाब आहे. असे प्रेम कायमस्वरूपी राहू दया. ही भावना या वेळीइम्रान बागवान यांनी व्यक्त केली.
यावेळी वडूजचे माजी नगराध्क्ष डॉ महेश गुरव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ, जेष्ठ नेते अशोक बैले, नगरसेवक तुषार बैले, अजित नलवडे, जविद मनोरे, शकील मुल्ला, आयाज मुल्ला, शरीफ अत्तार, डॉ अकबर काजी, शेखर जाधव, धनंजय चिंचकर, सज्जाद शेख, जावेद मुल्ला, इकबाल शेख, अजित रायबोले, प्रविण रायबोले, इम्रान खान, आरिफ मुल्ला, अमीन मुल्ला, दाऊद खान मुल्ला, सिकंदर मुल्ला, इसाक मुल्ला, मुन्ना मुल्ला, कुणाल रायबोले, बरकत मुल्ला, धनाजी कांबळे, गणेश रायबोले, ताहीर मोमीन, मंगेश राय बोले, सिद्धार्थ लोंढे, शफीक मुल्ला, नितीन नलावडे, अधिक वाघमारे, बाकुभाई मुल्ला आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
—————&&&————————————
फोटो – डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त रमजान ईद निमित्त शुभेच्छा देताना दलित व मुस्लिम बांधव,,,,, (छाया – सूरज पोतदार, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button