खटाव:-“भैरवनाथाच्या नावानं चांगभलं” या घोषाने चोराडे गावातील भैरवनाथाची यात्रा संपन्न.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा
खटाव:- “भैरवनाथाच्या नावानं चांगभलं” या घोषाने चोराडे गावातील भैरवनाथाची यात्रा संपन्न.
खटाव:- चोराडे येथील जागृत देवस्थान श्री.भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी श्री भैरवनाथ मंदिर हे पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे मंदिर असुन नवसाला पावणारा म्हणून हे देवस्थान प्रसिध्द आहे, प्रत्येक रविवारी तसेच पौर्णिमेला व नवरात्र उत्सवात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येत असतात.
शुक्रवार, दि.१४ एप्रिल रोजी सकाळी
६ ते दुपारी १ या वेळेत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री.भैरवनाथाची पालखीसह मानाच्या सासनकाठ्यां गुलाल खोबऱ्याची उधळण करत भव्य मिरवणुक निघणार आहे. यावेळी भाविकांच्यावतीने नवसाच्या एक रुपयांपासून हजारो रुपयांच्या माळा व नारळाचे तोरण भैरवनाथाच्या चरणी अर्पण केल्या जातात. दु.१ ते ५ मायाक्का ओविकार मंडळ चोराडे यांचा कार्यक्रम होणार असून रात्री ९ वाजता हंगामा ऑर्केस्ट्रा हंगामा म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा होणार आहे.
शनिवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी व रात्री छाया वीरकर वाघेरी यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.दुपारी ४ वाजता जंगी कुस्ती मैदान होणार आहे.
रवि वार,दि.१६ एप्रिल रोजी सकाळी
१० वाजल्या पासून बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायं ६ वाजता श्री संतोषी मातेची भव्य मिरवणूक निघणार असून परिसरा तील सर्व भाविक भक्तांनी श्री.भैरवनाथ यात्रेस उपस्थित रहावे,असे आवाहन यात्रा कमेटीचे सचिव संदीप पिसाळ,व सदस्याच्या वतीने करण्यात आले आहे.