केळघर:-ज्यांच्या पाठीमागे महिला त्यांच्या मतपेटीत नंबर पाहिला- एकनाथ शिंदे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्यांच्या पाठीमागे महिला त्यांच्या मतपेटीत नंबर पाहिला- एकनाथ शिंदे

केळघर दिनांक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीने भावाला साथ देण्यासाठी विधानसभा नगरपरिषद महानगरपालिका निवडणुकीत यश मिळवून दिले त्यामुळे ज्यांच्या पाठीमागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे जावळी तालुक्यातील सिद्ध होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केळकर तालुका जावळी येथे झालेल्या जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला यावेळी लाडक्या बहिणीस शिवसैनिकांनी व ग्रामस्थ मतदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कुसुंबी जिल्हा परिषद गटासह जावळी तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त केळकर या ठिकाणी जाहीर सभेमध्ये ते बोलत होते .या वेळेला शिवसेना ज्येष्ठ नेते व माजी आमदार सदाशिव सपकाळ संपर्क महिला प्रमुख रेशमा जगताप संपर्कप्रमुख शरद कणसे रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गाडे विठ्ठल पवार अशोक सपकाळ सुशांत मोरे सुनील गोळे व सातारा कराड आणि जावळी तालुक्यातील शिवसैनिक या जाहीर सभेला उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नवीन पर्व सुरू झालेला आहे पूर्वी चुनावी जुमला समजून लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे मिळवण्यात विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले एवढेच नव्हतं सावत्र भाऊंनी खोडा घातला म्हणून मतदानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी 232 चा जोडा दाखवला अनेक ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी माता-भगिनींचं मतदारांनी पार पाडावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे जावळी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सामान्य माणसांचे प्रश्न सोडवल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचाराचा वारसा जपणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहोत बोंडरवाडी धरण व इतर सर्व असे स्पष्ट करण्यात आले.




