आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-राजधानी गौरव सन्मान आदर्श उपसरपंच’ पुरस्काराने अनिल पांडुरंग साळुंखे सन्मानित.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-राजधानी गौरव सन्मान आदर्श उपसरपंच’ पुरस्काराने अनिल पांडुरंग साळुंखे सन्मानित.

सातारा :-लोक साम्राज्य न्यूज सातारा आणि इंद्रधनुष्य फौंडेशन सातारा राजधानी गौरव सन्मान २०२६ आयोजित केलेल्या या गौरव दिनी अहो रात्र जनतेच्या सेवेसाठी झटणारे नागठाणे गावचे सुपुत्र व नागठाणे गावचे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच मा.श्री.अनिल पांडुरंग साळुंखे (काका) साहेब यांना ग्राम विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लोक साम्राज्य न्यूज आणि इंद्रधनुष्य फाउंडेशन यांच्या वतीने *राजधानी गौरव सन्मान आदर्श उपसरपंच* *पुरस्कार’* देऊन अनिल पांडुरंग साळुंखे (काका) यांचा सन्मान करण्यात आला.
समाजाभिमुख कार्य, ग्राम विकासासाठी घेतलेले पुढाकार तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
उपसरपंच म्हणून कार्य करताना अनिल साळुंखे यांनी गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा , काका साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, श्री हनुमान (अभय) नवरात्रोत्सव मंडळ च्या वतीने सामाजिक,सांस्कृतिक राजकीय धर्मीक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळाली असून त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून ‘आदर्श उपसरपंच’ पुरस्कार देण्यात आला.
या सन्मानामुळे नागठाणे ग्रामपंचायत,व ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांकडून अनिल साळुंखे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.येणाऱ्या पुढील काळातही ग्रामविकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार उपसरपंच यांना व्यक्त केला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button