क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर मध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा ! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर मध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा ! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

पारनेर (राजकुमार इकडे) – अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. श्री दुर्गादिवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ मुकाट्याने सहन केला.

घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे या अशा ‘भोंदू’ महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पारनेर येथील पोलीस अधिकारी करत आहेत.ढवळपुरी येथे शनिवार (दि. १४ मार्च) रोजी यशवंत महाराज थोरात यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करत आरोपी यशवंत महाराज थोरात यांना रविवार दिनांक 15 मार्च रोजी पहाटे चार वाजता ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयान े आरोपीला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश दिले आहेत त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मारग हे करत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button