ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-पुसेसावळी परिसरात केबल खुदाईमुळे वाहन चालकांसह ग्रामस्थांचे हाल.

प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा

खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी केलेल्या साईड पट्ट्यांच्या खोदकामामुळे जागोजागी खड्डे पडल्याने व काढलेली सर व्यवस्थित न मुजवल्याने दगड मातीचे ढीग पडले आहेत. या ढिगातील खडीमिश्रित माती कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे राज्य मार्गालगत पसरल्याने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून या रस्त्यावरून मोठी वाहने गेली की डोळ्यात धुळ जात असल्यामुळे ग्रामस्थ व वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

तरी संबंधित कंत्राटदाराने हे काम करत असताना नियम धाब्यावर बसवून काम करणे सुरूच ठेवले आहे. तर काही ठिकाणी उकरलेली माती आहे तशीच ठेवली जाते.त्यात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने चर काढतात व केबल टाकून झाल्यावर जेसीबीने ती बुजवतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दगड व मातीचे ढीग तसेच पडलेले आहेत. तर केबलचा जोड असतो त्या ठिकाणी चेंबरसाठी काढलेले मोठे खड्डे रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहेत.
चोराडे ते पुसेसावळी मार्गावरील नांदणी पुलाच्या बाजूला असणाऱ्या साईट खोदल्यामुळे साईड पट्टीवरून गाडी घसरून शेणवडी येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू पडल्याची घटना घडलेली आहे.
त्या रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदलेल्या मुजवताना डांबरी रस्त्यावरील रिफ्लेक्टर निघालेली असून याबाबत संबंधित प्रशासनाने या रस्त्याची पाहणी करून साईट पट्ट्यावर डांबरी रस्त्यावरील झालेली दुरुस्ती करून घ्यावी.

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा कळस झाला आहे. केबल साठी चर खोदणाऱ्या या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यालगद दगड माती पसरली गेले असल्यामुळे शाळकरी मुलांच्या सायकली व वाहन चालकांच्या दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत. वाहनाच्या वरदळीने गावांमधील व्यवसायिकांसह प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. असे चोराडे सोसायटीचे माजी सदस्य विलास पिसाळ यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button