आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-वनश्री पुरस्कार प्राप्त रोहित शंकर बनसोडे व त्याची बहीण रक्षिता यांचे मदतीला धावली सातारा पोलीस दलातील 2006 बॅच.

प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा

महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त रोहित शंकर बनसोडे व त्याची बहीण रक्षिता यांनी शिखर शिंगणापूर परिसरात जवळपास 500 वनौषधी झाडांचे वृक्षारोपण केलेले असून त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी त्यांना जवळपास 30000 रुपयांच्या साहित्यांची मदत अपेक्षित असलेबाबत त्यांनी सातारा पोलीस दलात कार्यरत असलेले व शिंगणापूरचे रहिवासी असलेले पोलीस हवालदार अतुल कुंभार यांना सांगितले होते. त्यांनी त्यांचे सातारा पोलीस दलातील सन 2006 च्या बॅचमेटना प्रस्ताव सांगून मदत कार्य करण्याचे आवाहन केले. बॅचमधील पोलिस अंमलदार यांनी 48 तासात 37 000 रुपयांचा मदत निधी उभारला. सदरची संकल्पना वनश्री पुरस्कार प्राप्त माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना बोलून दाखवली.

माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांनी सहमती दर्शविल्यानंतर शिंगणापूर येथील वनौषधींचे रक्षितावन संवर्धनासाठी त्यांचे हस्ते माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर साहेब माननीय परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक मीना साहेब व माननीय पोलीस निरीक्षक अरुण देवकर साहेब यांचे उपस्थितीत रोहित व रक्षिता यांना लागणारे साहित्य त्यामध्ये पाण्याची मोटार चालवण्यासाठी अर्थिंगचे साहित्य, 600 फूट पाईप,पाण्याची झारी, हॅलोजन , वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी जलकुंड ,पाणपोई , झाडांकरिता लागणारे कळक वगैरे साहित्य प्रदान करून मदत केली. त्यावर कार्यक्रमास उपस्थित असलेले रोहित व रक्षिता यांचे वडील शंकर गोविंद बनसोडे यांनी कृतज्ञता व्यक्त करून माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब व सातारा पोलीस 2006 बॅचचे धकाधकीचे जेवणात वेळात वेळ काढून सातारा पोलीस दलाने केलेली मदत ही दुष्काळी मानदेशाला हिरवागार करण्याचा निर्धार केलेल्या पर्यावरण प्रेमी ,त्यांचे मुलांना दिलेला मोलाचा आधार असून भविष्यात या वृक्षांमुळे मिळणारी सावली येणाऱ्या पिढ्यांना सुखावह ठरणारी असल्याचे त्यांनी सांगितले व रोहित याने भविष्यात वृक्ष संवर्धनाचे कार्य आणखी जोमाने करीत राहणार असल्याचे सांगितले असे मनोगत व्यक्त करून आभार मानले.

सातारा पोलीस दलातील सन 2006 बॅचने एकजुटीने सामाजिक मान ठेवून यापूर्वी तसेच या कार्यक्रमाद्वारे केलेल्या मदत कार्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर साहेब माननीय परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक मीना साहेब माननीय पोलीस निरीक्षक अरुण देवकर साहेब यांनी आनंद व्यक्त करून मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रम पार पाडणे करता पोलीस हवालदार अमित झेंडे ,सनी आवटे ,गणेश कचरे, अंकुश यादव, हरिश्चंद्र कुचेकर ,रोहित तोरस्कर यांनी विशेष योगदान दिले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button