खटाव:-सामाजिक पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार- रणजितसिंह देशमुख.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा
सामाजिक पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार- रणजितसिंह देशमुख.
मायणी प्रतिनिधी दिनांक 6
: माझ्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल समाजभूषण हणमंतराव साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या सामाजिक गौरव पुरस्कारामुळे आपल्या वरती मोठे ओझे पडले आहे. आजवर मला माझ्या राजकीय कार्या बद्दल अनेक पुरस्कार मिळाले परंतु या सामाजिक पुरस्कारामुळे मला आणखी विकास कामे करण्याची ताकद मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला मिळालेला हा पहिला पुरस्कार असून हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख यांनी केले. समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात हरणाई सूत गिरणीचे संस्थापक चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांना संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आयोजित समारंभात सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई ,खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक संजीव साळुंखे ,तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुजाता महाजन ,संस्थेचे चेअरमन मिलिंद साळुंखे, अध्यक्ष डॉ.सयाजी पवार, अॅड प्रल्हाद सावंत, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष विजय शिंदे, सरपंच प्रतिनिधी सुहास शेटे, सौ.निर्मला साळुंखे, पांडुरंग लोहार ,संस्थेचे आजी-माजी मुख्याध्यापक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
रणजीत देशमुख पुढे म्हणाले स्व. हणमंतराव साळुंखे यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रवाहाच्या बरोबर न जाता प्रवाहाच्या विरोधात लढत राहिले. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची ताकद त्यांच्याकडे होती, म्हणून त्यांनी शिक्षण संस्था ,पतसंस्था, सोसायटी आदी संस्थांची निर्मिती करून त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांची उन्नती करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले कर्तृत्व संपन्न व्यक्तींचा समाजात सन्मान केला जातो. स्व. हणमंतराव साळुंखे यांनी शिक्षणाबरोबरच समाजकारण ,राजकारण व उद्योग क्षेत्रामध्ये केलेले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती आजही कायम राहिल्या आहेत. स्व. तात्यांना अभिप्रेत असलेले काम सहकार क्षेत्रात करणे गरजेचे आहे. आपणास मिळालेल्या पदांच्या माध्यमातून अनेक संसार उभे करून चुली पेटवण्याचे काम सहकार क्षेत्रातून होणे गरजेचे आहे. जबरदस्त इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावरच व्यक्तीस कार्य संपन्न बनता येते .स्वप्ने मोठी पहावीत व ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रम प्रसंगी महेश पाटील, मजनुभाई मुलानी, राजेंद्र कणसे, राजेंद्र लोखंडे,अनिल भोसले,संजय टकले, सचिन चव्हाण, पोपट गारळे, रजुभाई शिकलगार, युवराज बुधावले व कलेढोन व परिसातील अनेक सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. महेश गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सयाजी पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तसेच वैशाली त्रिंबके यांनी सूत्रसंचालन केले.
रणजीतसिंह देशमुख यांना सामाजिक पुरस्कार प्रदान करताना संजीव साळुंखे ,अनिल देसाई , डॉ. महेश गुरव, डॉ. संतोष गोडसे व मान्यवर