वैजापूर:-माध्यमिक विद्यालयातील लिपिक पदभरती पारदर्शक करा अन्यथा पदव्याची होळी करा.
प्रतिनिधी बाबासाहेब जाधव वैजापूर:-9665566273

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी बाबासाहेब जाधव वैजापूर
वैजापूर:-माध्यमिक विद्यालयातील लिपिक पदभरती पारदर्शक करा अन्यथा पदव्याची होळी करा.
माध्यमिक विद्यालय जरूळ येथे शंभर टक्के शासकीय अनुदानित रिक्त लिपिक पदाची पदभरती पूर्णतः पारदर्शक पद्धतीने करावी अन्यथा आम्ही आज पर्यंत घेतलेल्या शैक्षणिक पदवीचे तुमच्या हाताने होळी करा व आम्हाला ग्रामपंचायत कार्यलयासमोर उपोषण करण्याची परवानगी द्या, असे अनोखे अर्ज जरूळ गावातील तरुणाचे ग्रामपंचायत कार्यालयला प्राप्त झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाकडून शिक्षण प्रसारक मंडळाला निवेदन देऊन भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबवावा असे निवेदन देण्यात आले. सदरील पदभरती प्रक्रियासाठी सव्वीस मार्च रोजी मुलाखत प्रक्रिया पार पडली परंतु त्याबाबत गावातील अगदी मोजक्याच युवकांना माहिती मिळाली होती.त्यामुळे कित्येक विद्यार्थी यासंधी पासून वंचित राहिले होते. तसेच यामध्ये आर्थिक गोष्टीवर आधारित भरती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.परंतु आता वृत्तपत्रात नवीन जाहिरात देऊन पुन्हा एकदा गावातील सर्व पात्र उमेदवाराची मुलाखत घ्यावी तसेच स्पर्धा परीक्षाचे आयोजन करावे व उच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या व पात्र उमेदवारास संधी देऊन निवड करावी कुठल्याही प्रकारची आर्थिक स्वरूप पदभरतीस देऊ नये असे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाकडून संस्थेचे सचिव आसाराम रोठे यांना देण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर मतसागर, देविदास मतसागर, दादासाहेब मतसागर, गणेश मतसागर अनिल मतसागर, किशोर नरोडे, सचिन मतसागर ,उमेश मतसागर आदी.गावातील नागरिक उपस्थित होते.