सातारा:-सातार्यातील उद्योजकांच्या ‘महासंवाद’ला उदंड प्रतिसाद.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातार्यातील उद्योजकांच्या ‘महासंवाद’ला उदंड प्रतिसाद.
सातारा : सातारा शहराची ओळख उद्योगनगरी व्हावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्या सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट, सातारा च्या वतीने सातार्यातील स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉल येथे उद्योजकांचा महासंवाद आयोजित करण्यात आला होता. पावसाच्या सरी कोसळत असतानाच सातारा जिल्हा व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी उपस्थिती दाखवून या महासंवादाला उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सातारची नगरी आता उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेणार असल्याचे सुचिन्ह दिसू लागले आहे.
सातारा विभागाच्या ट्रस्ट चे चेअरमन किशोर सूर्यवंशी, इव्हेंट हेड प्रणित कुंदल, संदीप जाधव, संतोष खटावकर, संकेत पवार, संदीप पंडितराव, सचिन कुंभार, विशाल रहाटे, अजय शिंदे, निरंजन शेजवळकर, सुहासिनी निकम, रोहित शिंदे व कृष्णात मुळे यांच्या अथक परिश्रमाला या इव्हेंटने यश मिळाले आहे.
खाद्यपदार्थांबरोबरच आरोग्यदायक औषधे, हस्तकलेतून निर्मिती केलेले साहित्य तसेच इतर उत्पादनांच्या स्टॉल्समुळे उद्योजकांमध्ये व्यवसायासंबंधीच्या माहितीची देवाण-घेवाण झाली. प्रेरणादायी वक्ते व ज्येष्ठ मार्गदर्शक माधवराव भिडे यांनी 23 वर्षांपूर्वी सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टची स्थापना केली होती. लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे सातार्यात पहावयास मिळाले. एकमेका सहाय्य करु, अवघे होवू श्रीमंत, ब्रिदवाक्यानुसार संस्था वाटचाल करीत आहे. राज्यातील सर्व उद्योजक एकत्र करणे हा या मागचा हेतू आहे.
टी अँड टी इन्फ्राचे शिवराम थोरवे, पितांबरी प्रोजेक्ट्चे रवींद्र प्रभुदेसाई यांनी प्रत्येक स्टॉल ला भेटी देवून माहिती घेतली व मार्गदर्शनही केले. सातार्यात उत्पादन क्षमता चांगली असून व्यवसाय वाढीसाठी ट्रस्टने केलेला प्रयत्न फलदायी ठरत आहे. या कार्यक्रमाचे आकषणाचे केंद्रबिंदू ठरलेले प्रेरणादायी वक्ते शरद तांदळे यांच्या मार्गदर्शनाने सभागृह फुलून गेले होते. अनेक मान्यवरांनी या व्याख्यानाचे कौतुक केले तसेच या व्याख्यानाने आपण भारावून गेल्याचे सांगितले.
महिला उद्योजकांची उपस्थिती लक्षणीय असल्याने या महासंवादाला कौटुंबिक स्वरुप प्राप्त झाले होते. एकमेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या व्यवसायाला सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट ने मोठे दालन उपलब्ध करुन दिल्याची भावना नवोदित उद्योजकांनी बोलून दाखवली.
______________’___’______________________ फोटो _सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट आयोजित महासंवादमध्ये पाहणी करताना मान्यवर ( छाया- निनाद जगताप सातारा)