फलटण:-आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार वितरण.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार वितरण.
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर ता. फलटण हि सामाजिक संस्था गेली ६ वर्ष विविध उपक्रम राबवत असून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ” राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार” आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन द्वारे देण्यात आला आहे.
समाज हितासाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे तुमची स्त्री शक्ती यांचा आम्ही आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन गौरव करीत आहे.
लाभे स्त्री शक्तीचे वरदान
दातृत्व कर्तृत्व महान
व्हावी जगी कीर्ती
तू नवशक्ती मांगल्यमूर्ती
या उक्तीप्रमाणे खालील महिला भगिनींना पुरस्कार देण्यात आले आहेत.
यामध्ये डॉ.प्राची प्रसाद जोशी,
ॲड.दिपाली जोशी,शुभांगी गायकवाड खंडाळा, वर्षा काटवडे कराड , कीर्ती जाधव महाबळेश्वर, प्रतिभा चौगुले सातारा, सविता राऊत माण, माधुरी निकम कोरेगाव, शशिकला शिंगटे जावली, शुभांगी पवार कराड, विजया सणगर खटाव, राजश्री कुमठेकर वाई, जहिदा शिकलगार पाटण, शैला पिसे राजाळे, वनिता कदम गंगा माधवनगर, सुनिता कदम खडकी, स्मिता अडसूळ धुमाळवाडी.
इ.महिलांना मानपत्र देवून गौरव करण्यात आला आहे. अशी माहिती आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश तांबे व सचिव सौ.जयश्री तांबे यांनी दिली आहे. २१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उत्कृष्ट अशा कार्य करत आहेत. अशा कार्याची दखल घेऊन त्यांचा उचित सन्मान केल्यानंतर त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते.आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्यामुळे जिल्ह्यातून अशा उपक्रमाचे कौतुक होत आहे.