वाई:-‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांची वाईतून रॅली मतदार जागृतीनिमित्त कार्यक्रम.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई: दि. ०६ मार्च
‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांची वाईतून रॅली
मतदार जागृतीनिमित्त कार्यक्रम.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांनी वाईतून रॅली काढून मतदार जागृती केली. महाविद्यालयापासून सिद्धनाथवाडी मार्गे वाई शहरातून बसस्थानकापर्यंत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘मतदान करूया, देश घडवूया’, ‘माझे मत, माझा अधिकार’ अशा घोषणा देऊन, मतदारांच्यात जागृती निर्माण केली. या राष्ट्रीय व समाजोपयोगी कामातून समाधान मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.
रॅलीच्या सुरुवातीस महाविद्यालायाचे प्र. प्राचार्य डॉ. सुनील सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, कॅप्ट. डॉ. समीर पवार व डॉ. अंबादास सकट यांनी त्याचे नेटके नियोजन केले. याप्रसंगी एन.एस. एस. चे सल्लागार डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. अरुण सोनकांबळे, सुमंत सावंत, जितेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
या रॅलीमध्ये एन.एस. एस. चे स्वयंसेवक-स्वयंसेविका व एन. सी. सी. चे छात्र यांनी भाग घेतला.