खटाव:-मायणी येथील अजिंक्य पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथील अजिंक्य पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन.
मायणी प्रतिनिधी
(फोटो – वृद्धेला पाणी पाजत असताना धनाजी माने व सहकारी) आज बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी दुपारी २च्या दरम्यान मायणी बस – स्थानकाच्या आवारात जे माणुसकीचे दर्शन घडवले ते कौतुकास पात्र आहे. याबाबतची माहिती अशी – दुपारचे २वाजले होते.भर दुपारचे कडक ऊन पडले होते. अशा कडक उन्हात मायणी येथील बस – स्थानकाच्या आवारात एक वृद्ध महिला एका कट्ट्यावर गेल्या तीन दिवसांपासून झोपलेल्या अवस्थेत पडली होती.उन्हाचे चटके सहन करत ती बिचारी कळवळत होती. अशातच अजिंक्य पतसंस्थेचे व्यवस्थापक धनाजी माने यांच्या दृष्टीस हे दृश्य दिसले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या सर्व सहकार्यांना बोलावले.त्या वृद्धेची सहानुभूतीने विचारपूस केली. माने यांनी बाटलीने त्या वृद्धेस पाणी पाजले. विचारपूस केली.तेव्हा शांताबाई नीचळ असे नाव सांगितले.मुलाचे नाव पांडुरंग जाधव असे वृद्धेने सांगितले. चितळी व नांदोशी अशी २ गावे सांगितली. सर्व सहकाऱ्यांच्या साहाय्याने त्या वृद्धेस सावलीला उचलून ठेवले. भर उन्हात घडणारे हे माणुसकीचे दर्शन प्रत्येकाचे मन हेलावून सोडणारे होते. या महीलेबाबत संबंधितांना बस स्थानक यांच्याकडून कळवण्यात आले होते.परंतु गेले ३दिवस झाले वृद्ध महिला तशीच बस स्थानकावर बेवारस अवस्थेत आहे. –