ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:- आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी प्रकल्पांचे उद्देश बदलायचा हा भाजपचा फंडा – गव्हाणे

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे

आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी प्रकल्पांचे उद्देश बदलायचा हा भाजपचा फंडा – गव्हाणे
पिंपरी, दि. 19 (शफिक शेख) :- पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत ‘बेघरांसाठी घरे’ प्रायोजनार्थ आरक्षित घरांचा लाभ आर्थिक दुर्बल घटकांसाठी द्यावा, भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी म्हणजे वराती मागून घोडे, अशातला प्रकार असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. महापालिकेत भाजपने पाच वर्षांत जो गलथान कारभार केला आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे. गव्हाणे यांनी दिला आहे. बेघरांसाठीची घरे यासाठी पात्र लाभार्थी सापडत नसल्याने आता ही घरे आर्थिक दुर्बलांना देण्याचा हा प्रकार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आह, असे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हंटले आहे. केवळ टक्केवारी मिळते म्हणून कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबवायचे आणि नंतर स्वतःचे नाकर्तेपणा झाकण्यासाठी त्याचे उद्देश बदलायचा, हा भाजपचा फंडा आहे, असेही गव्हाणे यांनी म्हंटले आहे.
आपल्या प्रसिध्दीपत्रात अजित गव्हाणे म्हणतात, “गेल्या एक वर्षापासून ही घरे बांधून तयार आहेत. लाभार्थ्यांचा तपास नसल्याने घरांचे ताबे देता आलेले नाहीत. कारण ही घरे बेघरांसाठी आहेत, अर्ज मागवूनही बेघर लाभार्थी मिळत नसल्यामुळे वर्षभरापासून बांधून तयार असलेला हा प्रकल्प धूळ खात पडला आहे. करदात्यांच्या पैशाचा अशा प्रकारे गैरवापर केल्याचे असंख्य नमुने आहेत. कोणताही प्रकल्प राबविताना त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचे पध्दतशीर नियोजन पाहिजे. प्रत्यक्षात बेधरांसाठीची घरे यासाठी पात्र लाभार्थी निश्चित नसताना हा प्रकल्प राबविला गेला. आता ही घरे आर्थिक दुर्बलांना देण्याचा हा प्रकार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीच्या सुधारित मंजूर विकास योजनेतील मौजे आकुर्डी (स.नं. १३६/१,आरक्षण क्र. २८३ येथे ०. ९५ हेक्टर क्षेत्र) व मौजे पिंपरी (स.नं. / गट नं. १०९ पै व ११० पै आरक्षण क्र. ७७ येथे ०. ६४ हेक्टर क्षेत्र) येथील क्षेत्र ‘बेघरांसाठी घरे’ या प्रयोजनार्थ आरक्षिणाचे भूसंपादन केले आणि इमारती बांधल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने संबंधित आरक्षित जमिनीचा वापर बेघरांसाठी घरे बांधण्यासाठी केला परंतु, आरक्षणाच्या वापरामध्ये आता बदल केला जात आहे. बेघरांसाठी घरे (HDH) ऐवजी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरे (EWS) अशा प्रमाणे योजनेत फेरबदल केला जात आहे. त्यासाठी महापालिका प्रशासक ठराव क्र. २२१ ला दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी मंजुर केला आहे. हा सगळा प्रकार अगदीच उफराटा आणि गलथान कारभाराचा नमुना आहे. मुळात भाजपने पाच वर्षांत कसा कारभार केला ते पहायचे असेल तर या प्रकल्पाकडे पहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आता या सगळ्या प्रकरणांचा पर्दाफाश कऱणार आहे, असा इशाराही गव्हाणे यांनी दिला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button