सातारा:-जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागठाणे चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागठाणे चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागठाणे ता.जि. सातारा या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण
सोहळा चौंडेश्वरी मंगल कार्यालय नागठाणे येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे पंचायत समिती सदस्या सातारा सौ.विजयाताई गुरव,नागठाणे बीट शिक्षणविस्तारअधिकारी सौ.सुजाता जाधव ,नागठाणे केंद्राचे केंद्रप्रमूख श्री.दादाजी बागुल सर नागठाणे गावचे उपसरपंच श्रीअनिल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे ,रविराज साळुंखे, सौ.वंदना सुतार ,सौ .शशिकला जाधव ,विकास सेवा दोनचे व्हाईस चेअरमन श्री.गणेश साळुंखे श्री.संतोष साळुंखे तसेच राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत माजी पोलिस निरीक्षक श्री.बत्तू तात्याबा मोहिते यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.अविनाश साळुंखे.उपअध्यक्ष सौ.पुनम सागर साळुंखे. श्री.कपिल साळुंखे यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितितील सर्व सदस्य उपस्थिती होते
या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कृत माजी पोलीस निरीक्षक श्री.बत्तू मोहिते साहेब यांनी शाळेच्या विकासा साठी पाच हजार रुपयांची देणगी देऊन बहुमोल सहकार्य केले मोहिते साहेब हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून ते शाळेसाठी नेहमी विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतात या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव म्याडम व सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिति मोलाचे कार्य करुन यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितरीत्या पार पाडले या वेळी पालक ग्रामस्थ विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तर कार्यकर्माचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन अलका साळुंखे यांनी केले.