ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
MSEB मुंढे कार्यालय येथे भीमआर्मी चे ढोल ताशा वाजवून निदर्शने
प्रतिनिधि:- अभिजित बल्लाळ कराड

MSEB मुंढे कार्यालय येथे भीमआर्मी सं.र.द.चे ढोल ताशा वाजवुन निदर्शने
पाडळी येथिल इंदिरानगरमधे राहते घरांवरुन विजवाहक तार गेलेली आहे सदर तार चार ठीकाणी जोडलेली असुन अनेकवेळा हे जोड निघुन तार घरांवर पडलेली आहे ही धोकादायक तार दुरुस्त करावी अशा तक्रारी वारंवारा करुनही दखल न घेतलेमुळे आज भीमआर्मीचे वतिने हे आंदोलन करण्यात आले.उपअभियंता जाधव यांना निवेदन देवुन आंदोलन संपविण्यात आले.यावेळी भीमआर्मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी,जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे,पाटण तालुका संघटक फिरोज मुल्ला(सावकार),कार्याध्यक्ष प्रविण सावंत,इरफान मुल्ला सामाजिक कार्यकर्ते मा.शफीक मुजावर उप सरपंच सलीम मुजावर नुर मुल्ला कादर भाई सर्फराज मुल्ला,संजय पाटोळे व पाडळी गावचे नागरीक उपस्थित होते.