पुणे:-निसार फाउंडेशनतर्फे महिलांचा सत्कार व स्कॉलरशिप वाटप.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
निसार फाउंडेशनतर्फे महिलांचा सत्कार व स्कॉलरशिप वाटप.
पुणे, दि. ११(रफिक शेख) : सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे माजी विद्यार्थ्यांनी ज्यांनी संस्थेतर्फे कोर्स पूर्ण करुन कामावर रुजू झालेत अशा विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.
यावेळी निसार फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार व स्कॉलरशिप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनाब जमील चीनिवर व हाफिझ शेख यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच निसार फाउंडेशनच्या वतीने एका विद्यार्थिनीची शाळेची दोन वर्षाची फी देण्यात आली.
भविष्यात असेच महिलांना सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंग तर्फे विविध प्रकारचे कोर्सेस व प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी साठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे हाफिझ शेख यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अझीमा, डॉ. बुशरा, जबीन मॅडम, निलोफर शेख, गझिया पाशा हे उपस्थित होते.