पुणे:-मुलांच्या भल्यासाठी जनतेकडून सहकार्य भावना.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मुलांच्या भल्यासाठी जनतेकडून सहकार्य भावना
पुणे, दि.११.३.२३ (रफिक शेख) : “माझा मुलगा अभ्यास करायचे सोडून सारखे मोबाईलवर गेम खेळतोय, तरी एअरटेलचे सिम बंद करा” अशी पालकाची एअरटेल कंपनीच्या ग्राहक अधिकारीशी विनंती करुनही एअरटेलचे सिम बंद करण्यास नकार दिला.
येथील संबंधित पालक अब्दुल रहिम सत्तार शेख याची माहिती अशी होती की त्यांचा मुलगा अभ्यास करायचे सोडून रात्री ३ ते ४ वाजेपर्यंत गेम खेळत असतो आणि सकाळी उशिरा उठतो तर यासाठी त्यांनी एअरटेल कंपनीच्या १९८ स्नेहल कुमारी या ग्राहक अधिकारीशी सिम बंद करण्यास विनंती केली.
त्याचप्रमाणे मुलाचे काही बरे-वाईट झाले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकाने ग्राहक अधिकारीशी विचारुन सिम बंद करण्यास सांगूनही नकार दिल्यानंतर मुलाचे आई-वडील विचारात पडले की आता आपल्या मुलाचे कसे होणार.
तरी पालकांकडून कंपनीच्या ग्राहक अधिकारीशी विनंती करुनही सिम बंद करण्यास नकार दिल्यामुळे याबाबतची चर्चा जनतेतून केली जात आहे की संबंधित कंपनींनी मुलांच्या भल्यासाठी जनतेला सहकार्य करावे.