आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रात भरारी घ्यावी :-सुमनताई पाटील

प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी आशितोष चव्हाण.

महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रात भरारी घ्यावी :-सुमनताई पाटील

प्रदीपदादा चोरगे मित्र परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न.

वाई :- सध्या महीला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. आधुनिक युगातील कौश्यल्य आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास प्रत्येक क्षेत्रात महिला ठसा उमठवू शकतात महिलांनी सक्षम होऊन सर्व क्षेत्रात भरारी घ्यावी असे प्रतिपादन श्रीमती सुमनताई पाटील यांनी गंगापूरी, वाई येथे प्रदीपदादा चोरगे मित्रपरिवार आयोजित महिलादिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक प्रदीप चोरगे, संगीता लोळे, शितल शिंदे, भावना गायकवाड, वासंती निंबाळकर, नीलम कदम, संयुक्ता देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिवव्याख्यात्या सायली भोसले म्हणाल्या आजच्या नारीने जिजाबाई सावित्रीचा आदर्श घेऊन नवी पिढी घडवली पाहिजे. जिजाबाई ने दिलेल्या शिकवणीमुळे छ. शिवाजी महाराज एक आदर्श राजा सिद्ध झाले. यावेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख, निलिमा सरकाळे, अनिता शिंदे, डॉ पद्मश्री चोरगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रदीप चोरगे यांनी राबवत असलेल्या महिला सबलीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी, डिनर शेट, फॅन, मिक्सर, टी. व्हीचे वितरण करण्यात आली. कार्यक्रमात आदर्शमाता वत्सला शिंदे, विमल चोरगे, विद्या काकडे, मालती तरडे, प्रमिला हगवणे, अग्निवीर प्रियंका जायगुडे, अवंतिका पोळ, २७ बचत गटांच्या अध्यक्षांचे, पालिकेच्या २७ महिला स्वच्छता कामगारांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रवींद्र चोरगे, संजय जाधव यांनी केले. आभार अशोकराव सरकाळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रदीपदादा चोरगे मित्र परिवार व गंगापुरी परिसरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

महिलादिन कार्यक्रमात टीव्ही मानकरी राजश्री मांढरे यांना टीव्ही प्रदान करताना सुमनताई पाटील, सायली भोसले, प्रदीप चोरगे, रवींद्र चोरगे, अशोक सरकाळे इ.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button