ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-भाजपा सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्षपदी दिवंगत ख्यातनाम अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रियाताई बेर्डे.

प्रतिनिधी शफीक शेख:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

भाजपा सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्षपदी दिवंगत ख्यातनाम अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रियाताई बेर्डे.

मुंबई, दि. १० (शफीक शेख)- भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेल्या दिवंगत ख्यातनाम मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सौभाग्यवती प्रियाताई बेर्डे यांच्यावर भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास दाखवुन त्यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी केली.

बेर्डे यांच्या नियुक्तीचे पत्रे मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी देऊन सौ. बर्डे यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी नामदार बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या.

एकेकाळी मराठी आणि हिंदी सिनेमा जगतावर राज्य केलेल्या आपल्या पती दिवंगत ख्यातनाम अभिनेते श्री. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याच प्रमाणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर्वसामान्यांच्या सहभागाने उज्ज्वल कार्य करण्याचे आश्वासन यावेळी सौ. बेर्डे यांनी बोलताना दिले.

यावेळी निर्माता तथा उद्योजक वेदांग महाजन, निर्माता अमर गवळी, धनंजय वाठाकर, कलाकार गिरीश परदेशी, लोकेश गुप्ते, केदार सोमन, संतोष बर्डे, माधुरी जोशी, विद्या पोकेपाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button