आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा येथे ज्योतिष शास्त्री वर्गाचे शानदार उद्घघाटन.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

सातारा येथे ज्योतिष शास्त्री वर्गाचे शानदार उद्घघाटन.

मायणी प्रतिनिधी__ज्योतिष शास्त्रात सखोल आणि चिकित्सक संशोधनात्मक अभ्यासा साठी ‘शास्त्री’ हा पदवी अभ्यासक्रम असतो हा अभ्यासक्रम पूर्वी सातारा येथे सुरू होता परंतु कोरोनाच्या कालावधीत तो बंद झाला परंतु 2022 2023 या कालावधीमध्ये सातारा ज्योतिष मंडळ व महाराष्ट्र ज्योतिष मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू होऊन या वर्गाचे शानदार उद्घघाटन पश्चिम महाराष्ट्रातील प्रख्यात ज्योतिषी अभ्यासक प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते व महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे नुकतेच पार पडले या यावेळी ग्रहांकित ज्योतिष मंडळ नाशिकचे प्राचार्य किशोर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणात एडवोकेट सपना पवार यांनी ज्योतिष शास्त्री ही पदवी मिळवताना कसा चौफेर अभ्यास करावा लागतो याविषयी मार्गदर्शन केले तर अनिल चांदवडकर यांनी सांगितले की शास्त्रीय पदवी परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी दिव्यांग घटस्फोट अपघात कॅन्सर रुग्ण यांच्या पत्रिकेवरून चौफेर अभ्यास करावा तसेच तुलनात्मक संशोधन करून आपला रिसर्च तयार करावा असे सांगितले तर किशोर जोशी यांनी समाजात घडणाऱ्या घटनांचा ज्योतिषाच्या आधारे परामर्श घ्यावा असे सांगितले प्राचार्य रमणलाल शहा यांनी सांगितले की ज्योतिष आणि अध्यात्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्योतीष शिकताना अध्यात्माचा ही विचार करावा असे सांगितले या कार्यक्रमास उपाध्यक्ष पद्मा कासट नंदकुमार जोशी सपना पवार एडवोकेट श्रीराम देव अंजली रांजणे मनोज जोशी देवरुखकर असे अनेक ज्योतिष प्रेमी उपस्थित होते शेवटी पद्मा कासट यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन एडवोकेट श्रीराम देव यांनी केले. के

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button