खटाव:-मायणी परिसरातील चलनात पाचशे रुपयाच्या बनावट नोटा?
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी परिसरातील चलनात पाचशे रुपयाच्या बनावट नोटा?
मायणी प्रतिनिधी_खटाव तालुक्याच्या दक्षिणेकडील व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या मायणी परिसरात सध्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दिसु लागल्या आहेत.खरे तर मायणी हे व्यापाराचे प्रमुख केंद्र असून येथे मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज ,इंग्लिश मीडियम शाळा ,दवाखाने ,कापड दुकाने ,स्टेशनरी दुकाने ,बँका ,पतपेढ्या मोठ्या प्रमाणात असल्याने कलेढोण पासून व महासुर्णे येथून अनेक नागरिक व्यवहारासाठी येतात .परंतु सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्याने व एक हजार रुपयाची नोट चालनात न आणल्याने सर्व रोखीचे व्यवहार पाचशे रुपयाच्या नोटावर चालतात .सध्या अशा बनावट नोटा चलनात फिरत असून अशा नोटा मिळाल्यास त्वरित मायणी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.