कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये महिला दिनानिमित्त माजी विद्यार्थिनींचा सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपर्क प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये महिला दिनानिमित्त माजी विद्यार्थिनींचा सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
कराड 🙁 दि. 8 मार्च, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये महिला दिनाचे औचित्यसाधून अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने यशस्वी उद्योजिका झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा व विद्यार्थिनी मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयांमध्ये शिक्षण पूर्ण करून आता यशस्वी उद्योजिका असणाऱ्या सौ. प्राजक्ता शहा, सिक्वेन्स बुटिक, कराड, डेमपोस्ट या मासिकाच्या संपादक कु. स्नेहल वरेकर, मेकअप आर्टिस्ट म्हणून आपले करिअर विकसित केलेल्या कु. रेणुका माळी, फोटो स्टुडिओच्या माध्यमातून प्रोफेशनल फोटोग्राफर असलेल्या सौ. प्राजक्ता शिरगावे, आवड म्हणून मेकअप आर्टिस्ट हे करियर जोपासणाऱ्या व सध्या यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बीची पदवी घेत असलेल्या कु. रेणुका कोळी या यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाला गौरवशाली व यशस्वी विद्यार्थिनींचा वारसा असून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण माजी विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे, यातून विद्यार्थिनींनी प्रेरणा घेऊन आपले करिअर विकसित करावे असे मत प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांनी व्यक्त करून उपस्थित सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना संपादक कु. स्नेहल वरेकर यांनी महिलांनी आर्थिक बाबतीत साक्षर होणे आवश्यक आहे तसेच भाषेमध्ये देखील आपण लिंगसमानता आणणारे शब्द जसे की लेखक, संपादक, अध्यक्ष, इ. वापरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. सौ. प्राजक्ता शहा यांनी आपल्या सिक्वेन्स बुटीक चा ऑनलाईन ब्रँड लॉन्च झाल्याबद्दल माहिती देऊन विद्यार्थिनींना फॅशन डिझाईनिंग या क्षेत्रातील करिअर बद्दल मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थिनींनी व्यावसायिक फोटोग्राफी बद्दल सौ. प्राजक्ता शिरगावे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
विद्यार्थिनी मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्तीपर गीतगायन तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण केले. महाराष्ट्राची लोकधारा या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणीनृत्य, कोळीनृत्य, शौर्य गीत यांचे सादरीकरण करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरण यावरती एक लघुनाटिका तसेच स्त्रीभ्रूण हत्या या विषयावरती एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थिनींनी केले.
मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सौ. एस. आर. सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राजक्ता खेडकर व कु. अल्फिया मुल्ला यांनी केले तर आभार प्रा. सौ. एस. पी. पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रम संयोजन प्रा.डॉ.सौ. एम. ए. शिंदे, प्रा. सौ. एन. एस. देसाई, प्रा. सौ. एस. आर. पाटील, प्रा. सौ. एम. एम. चव्हाण, प्रा. एस. सी. भस्मे, सौ. के. एच. वायदंडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापिका व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.