आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे चिंचवड:-महिलादिनीही आपले कर्तव्य बजावणा-या महिला पोलिसांचे ‘आप’तर्फे अभिनंदन.
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
महिलादिनीही आपले कर्तव्य बजावणा-या
महिला पोलिसांचे ‘आप’तर्फे अभिनंदन.
चिंचवड, दि. 08 (शफिक शेख) :- आज महिला दिनाच्या दिवशी जेव्हा सर्व महिला घरी बसून सुट्टी घेवून आनंद साजरा करीत असताना त्यांच्या आनंदात खंड पडू नये म्हणून आजच्या दिवशीही ज्या महिला पोलीस आपल्या कर्तव्यावर दृढ आहेत अशा महिला पोलिसांचे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महिला संपर्क प्रमुख ज्योती शिंदे, अमृता दंडवते आणि संगीता बिरादार यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले. चिंचवड चौकातील महिला ट्रॅफिक पोलीस वृषाली काळे आणि सौ. वाघमारे यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.