नवीन थेरगाव रूग्णालयात अथक प्रयत्नानंतर आई आणि बाळाला मिळाले नवजीवन
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483
नवीन थेरगाव रूग्णालयात अथक प्रयत्नानंतर
आई आणि बाळाला मिळाले नवजीवन
थेरगाव, दि. 6 (शफिक शेख) :- 8 महिन्यांच्या गरोदर असलेल्या मातेला आणि तिच्या बाळाला नवीन थेरगाव रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांचा पराकाष्ठा करीत नवीन जीवदान देण्यात मोलाचे कार्य केले. याबद्दल रूग्णाचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक याबाबत रूग्णालयातील डॉक्टरांचे अभिनंदन करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवीन थेरगाव रुग्णालयात ८ महिन्यांची गरोदर असलेली एक महिला रुग्ण प्रसूती कक्षात आली. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अत्यवस्थ होती तसेच तिचा हृदय विकाराने मृत्यू होण्याची दाट शक्यता होती. ८ महिन्यांची प्रसूती रुग्ण, जन्माला येणारे नवजात बाळ आणि वैद्यकीय अधिकार्यां समोरची आव्हाने हा संपूर्ण प्रसंग डॉ. उमेश सांगत होते.
गरोदर महिला रुग्णाला हृदयविकाराचा त्रास असल्याने रुग्ण आणि बाळ दोघांचाही मृत्यू होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे कमीतकमी वेळेत रुग्णाला शर्तीचे प्रयत्न करून वाचविण्याची जबाबदारी डॉक्टरांची होती. अनेक तास अनेक आव्हानांना सामोरे जात अखेर या प्रयत्नांना यश आले ते बाळाच्या रडण्याच्या आवाजाने. पण वैद्यकीय अधिकार्यांसमोर दुसरे आव्हान होते ते मातेचाही जीव वाचवणे. डॉक्टरांच्या अथक परिश्रमातून पुढील काही तासांनी प्रसूती रुग्णाची हालचाल सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागली आणि गेले अनेक तास सुरु असलेले जीवन-मरणा मधील जीव वाचविण्याचे युद्ध अखेर यशस्वी झाले.
या अवघड परिस्थिती मध्ये फिजिशियन डॉ कृष्णा व त्यांचे सहकारी, थेरगाव रुग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, भूलतज्ञ डॉ. नेहा पाटील, डॉ. सोनेकर, डॉ. इलाफ, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. संदीप पाटील (रुबी अल केअर) यांच्या समन्वयाने ऑब्जी प्रमुख डॉ असलकर, डॉ. मनीष, डॉ. शितल, डॉ. अश्विनी, डॉ. नेहा खान व त्यांचे सहकारी, अतिदक्षता विभाग, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांचे मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ञ डॉ. अश्विनी कराळे व त्यांचे सहकारी, शस्त्रक्रिया विभागाचे कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.