फलटण:-नांदलच्या ज्योती कांबळेची उपजिल्हाधिकारीपदी निवड.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी आशितोष चव्हाण
नांदलच्या ज्योती कांबळेची उपजिल्हाधिकारीपदी निवड
नांदल, ता. फलटण येथील ज्योती हिंदुराव कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत यश संपादन केले. त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असून, भटक्या विमुक्त जमाती (एन.टी.सी.) प्रवर्गामधून त्या राज्यात प्रथम आल्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ज्योती कांबळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदल या ठिकाणी झाले असून पुणे कृषी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१९ साली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची वनविभागात ‘आरएफओ’ या पदावर निवड झाली होती. सध्या त्या परीक्षाधीन ‘नायब तहसीलदार’ म्हणून नागपूर येथे प्रशिक्षण घेत असून २०२१ साली झालेल्या लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.