फलटण:-जिल्हा परिषद शाळा गोळेगांव केंद्र फरांदवाडी येथे बालबाजार उत्सहात पार पडला.
प्रतिनिधी विनोद पाटील :-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी विनोद पाटील :-9762274165
जिल्हा परिषद शाळा गोळेगांव केंद्र फरांदवाडी येथे बालबाजार उत्सहात पार पडला.
जिल्हा परिषद शाळा गोळेगांव केंद्र फरांदवाडी ,ता फलटण ,जि सातारा.या शाळेत विद्यार्थ्यांना गणिती क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार,नफा,तोटा,विक्री कौशल्य विकास, संवाद कौशल्य विकास, बचतीची सवय या विविध शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त कला गुणांचा विकास करण्यासाठी अनौपचारिक शिक्षण गरजेचे असते.यासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फरांदवाडी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा गोळेगांव शाळेने शिक्षक विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाल बाजार भरवण्यात आला होता.त्यास पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.विद्यार्थी सहभाग कौतुकास्पद होता.शाळा एक शिक्षकी असुनही मुख्याध्यापक श्रीमती गायकवाड मॅडम यांनी खुप मेहनतीने नियोजन व कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली.