सातारा:-क्रिडा स्पर्धेत विठ्ठलवाडी ( चिंचणी) शाळेचे घवघवीत यश.
प्रतिनिधी गोरख जाधव खटाव:-9822626206

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी:- खटाव तालुका कार्याध्यक्ष- गोरख जाधव-9822626206
क्रिडा स्पर्धेत विठ्ठलवाडी ( चिंचणी) शाळेचे घवघवीत यश.
स्व.यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा दि:- 02/03/2023 रोजी शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न झाल्या.त्यामध्ये विठ्ठलवाडी शाळेचा विद्यार्थी चि. आयुष संतोष निकम याने 400 मीटर धावणे (लहान गट)या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळविला. त्याने केंद्र, बिट, तालुका स्तरावर देखील प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच शाळेतील विद्यार्थीनी तन्वी नामदेव निकम हिने देखील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पधेमधे सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सुरेखा निकम, सर्व पालक , ग्रामस्थ , मुख्याध्यापक जाधव सर, वर्गशिक्षक मारुती लावंड , खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी भराडे मॅडम, भागविस्तार अधिकारी गायकवाड मॅडम व ललगुण केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. प्रमोद जगदाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.