फलटण:-श्रीमती शारदादेवी कदम यांना माई स्मृती नारीशक्ती सन्मान राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी विनोद पाटील:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
श्रीमती शारदादेवी कदम यांना माई स्मृती नारीशक्ती सन्मान राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान
स्वर्गीय श्रीमती मंदाकिनी बुवासाहेब कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरण स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरवी ता फलटण जि सातारा येथे जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सचिव व सातारा जिल्हा परिषद सातारा च्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम यांना शैक्षणिक, सामाजिक, महिला व बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “माई स्मृती नारीशक्ती सन्मान राज्य स्तरीय पुरस्कार” मराठी मासिक दमयंती व उध्दव दमयंती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी मासिक दमयंतीच्या संपादिका सौ कल्पना कदम यांचे शुभहस्ते शाल, श्रीफळ, भगवतगीता ग्रंथ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह मा श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फलटण तालुक्यातील जेष्ठ नेते मा सुभाषराव शिंदे होते.प्रमुख पाहुणे म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व युवानेते मा सह्याद्री चिमणराव कदम, प्रगतशील यशस्वी उद्योजक सौ शर्मिला काकडे, श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटणचे संचालक शिवराज संपतराव कदम,कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे संचालक रामभाऊ कदम,गिरवी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली राजेंद्र कदम, उपसरपंच संतोष मदने,गिरवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कदम, किर्तनकार ह.भ.प.विजय बोबडे महाराज उपस्थित होते.
याप्रसंगी स्वर्गीय मंदाकिनी बुवासाहेब कदम यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राध्द) निमित्ताने सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.विजय बोबडे महाराज बिबीकर यांचे सुश्राव्य किर्तन प्रवचन संपन्न झाले. गिरवी,बोडकेवाडी मधील भजनी मंडळ सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वर्गीय श्रीमती मंदाकिनी बुवासाहेब कदम यांचे स्मरणार्थ “स्मृती गंध” हा मराठी मासिक दमयंतीचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला त्याचे प्रकाशन फलटण तालुक्यातील जेष्ठ नेते मा सुभाषराव शिंदे,जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सचिव श्रीमती शारदादेवी कदम,जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम, प्रगतशील यशस्वी उद्योजक सौ शर्मिला काकडे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी किसनराव बाजीराव कदम(परमेश्वर)( तीर्थक्षेत्र तुळजापूर आई तुळजाभवानी माता मंदिर देवस्थान मधील पुजारी) मालोजीराजे रोजे घाटगे,सौ कुसुम राजे घाटगे, संभाजीराजे राजे घाटगे, बाबासाहेब राजे घाटगे,सौ पद्वमावती राजे घाटगे,मनोज राजे घाटगे,सौ माधुरी राजे घाटगे (वेळापुर ता माळशिरस जि सोलापूर), राजेन्द्र शिंदे,सौ.लता शिंदे प्रा.मंजित शिंदे,सौ सायली शिंदे, शंकर पवार,सौ मंगल पवार ( पिराची कुरोली ता पंढरपूर जि सोलापूर),जयश्री माने-देशमुख, शहाजी माने-देशमुख( वेळापुर ता माळशिरस जि सोलापूर) संजय शिंदे, श्रीमती अरुणा शिंदे, रांणदकर (सातारा), अशोक रणवरे,सौ वर्षा रणवरे,दिपक रणवरे,सौ शोभा रणवरे, सागर रणवरे,सौ अश्विनी रणवरे, श्रीमती नलिनी रणवरे, रविंद्र रणवरे,सौ पुष्पा रणवरे,सौ.मोहिनी रणवरे,सौ रंजना रणवरे,ऋषीराज रणवरे,नवल रणवरे, श्रीमती विजयमाला रणवरे, युवराज रणवरे,सौ सुनंदा रणवरे (जिंती ता फलटण जि सातारा) ,भारत मोहिते,सौ रेखा मोहिते,रोहन मोहिते, सचिन भोसले,सौ पल्लवी भोसले (साखरवाडी ता फलटण जि सातारा), नंदकुमार भोसले, पद्मावती भोसले (पिंपळवाडी साखरवाडी ता फलटण जि सातारा), सचिन जगताप, सौ.रंजना जगताप (साखरवाडी ता फलटण जि सातारा), संजय काटे- देशमुख,सौ रोहिणी काटे -देशमुख ( काटेवाडी ता बारामती जि पुणे) ,मनोज जगताप,सौ मिनाताई जगताप,संभाजीराव काकडे-देशमुख, हरिश्चंद्र काकडे – देशमुख,सौ सुमन आनंदराव खलाटे, धनंजय निकम ( वाणेवाडी ता बारामती जि सातारा), मदन निकम,सौ राणी निकम (वेळे कामठी ता जि सातारा), राजेन्द्र ताटे -देशमुख,सौ शितल काटे -देशमुख.(कासेगाव ता पंढरपूर जि सोलापूर),
अमोल पिसाळ,सौ शितल पिसाळ,सौ संजिवनी पिसाळ ( बावधन ता वाई जि सातारा)
विष्णू राजे घाटगे, पोपटराव राजे घाटगे, अनिल निंबाळकर ( मोळ ता खटाव जि सातारा), दत्तात्रय भोईटे (डिस्कळ ता खटाव जि सातारा), मोहन बागल ( राजाळे ता फलटण जि सातारा), सुरसिंगराव रणवरे, सौ.माधुरी रणवरे (निंभोरे ता फलटण जि सातारा) विकास गायकवाड ( तरडगाव ता फलटण जि सातारा),
दत्तात्रय बनकर, चांगदेव बनकर ( वेळापुर ता माळशिरस जि सोलापूर),
विजयराव निंबाळकर,सौ मिना निंबाळकर (येळीव ता माळशिरस जि सोलापूर)
सौ निकिता शिंदे (पिंप्रद ता फलटण जि सातारा), सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर,पुणे, जळगांव, मुंबई जिल्ह्यातील व गिरवी गावातील ग्रामस्थ, फलटण शहर, तालुक्यातील ग्रामीण भागातील जाधववाडा,बोडकेवाडी,धुमाळवाडी,निरगुडी,सासकल,निभोंरे,जिंती, साखरवाडी,पिंप्रद,पवारवाडी, शिंदेवाडी,खुंटे,तरडगाव,बिबी, पिंपळवाडी,होळ,फडतरवाडी,
ढवळ,वाखरी इत्यादी गावातील अधिकारी व पदाधिकारी, मान्यवर मंडळी उपस्थित होते.