खटाव:-मायणी कृषी मंडलाधिकारी दाखवा आणि हजार रुपये मिळवा.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी कृषी मंडलाधिकारी दाखवा आणि हजार रुपये मिळवा.
मायणी प्रतिनिधी__खटाव तालुक्यातील मायणी हे बाजारपेठेचे गाव असून या गावात पूर्वी कृषी मंडलाधिकारी यांचे कार्यालय होते. या कार्यालयात चार ते पाच कृषी पर्यवेक्षक होते. परंतु नंतरच्या कार्यानंतरच्या काळात कार्यालय बंद झाले.परंतु तत्कालीन ग्रामपंचायतचे सरपंच सचिन गुदगे यांनी प्रयत्न करून ग्रामपंचायतीची जागा देऊन हे कार्यालय विठोबा मंदिर येथे सुरू झाले. या कार्यालयात दिलीप दाभाडे व अन्य चार पर्यवेक्षक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असत त्यानंतर दिलीप दाभाडे सेवानिवृत्त झाल्यानंतर या कार्यालयाकडे कोणीही फिरकले नाही तसेच या कार्यालयात मंडलाधिकारी कोण आहेत. हेही शेतकऱ्यांना माहिती नाही. तसेच हे कार्यालय कधीही सुरू नसते त्यामुळे शेतकरी नाहक हेलपाटे घालतात याबाबत वरिष्ठ अधिकारी राहुल जितकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्कही होत नाही आता शेतकऱ्यावर मंडलाधि कृषी मंडलाधिकारी दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.