वैजापूर:-ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी शिरजगाव येथील तत्कालीन ग्रामसेवक निलंबित.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी शिरजगाव येथील तत्कालीन ग्रामसेवक निलंबित
वैजापूर मौजे शिरजगाव येथील तत्कालीन ग्रामसेवक श्री डि. के . गिरी यांना दिनांक 15 2 2023 रोजी ग्रामसेवक पदावरून निलंबित करण्यात आले आहे जुन्या शाळेच्या स्क्रॅप मटेरियल विक्री करताना स्पर्धात्मक लिलाव न केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे शिरसगाव येथील विद्यमान सरपंच सो सीमा विश्वासराव निंबाळकर व उपसरपंच बाबासाहेब रामभाऊ पाटील डांगे यांनी दिनांक 13 6 2022 रोजी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय वैजापूर यांच्याकडे डी के गिरी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती सदरील तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 30 11 2022 रोजी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान ग्रामसेवक डी के गिरी हे दोषी आढळून आल्याने दिनांक ५/१/२०२३ रोजी चौकशी अहवाल पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला त्यातील खालील बाबी निदर्शनास आल्याने करण्यात आले निलंबन
१) ग्रामपंचायत शिरसगाव येथील दिनांक. २९/१२/२०२१ रोजी सरपंच उपस्थित नसताना त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतल्याचे दर्शवून बनावट अभिलेखे तयार करणे
२) जिल्हा परिषद शाळेचे जुन्या साहित्याचा लिलाव करताना ग्रामपंचायतीची मान्यता न घेणे तसेच शाळा साहित्याचा लिलाव करताना किमान तीन लिलावधारकांच्या उपस्थिती मध्ये लिलाव करणे आवश्यक असताना केवळ एकच लिलावधारकाच्या उपस्थितीत नियमबाह्यरित्या लिलाव करून ग्रामपंचायतचे आर्थिक नुकसान करणे
३) साहित्याचा लिलाव झाल्यानंतर लिलावाची रक्कम नियमाप्रमाणे धनकर्ष किंवा धना देशाद्वारे अथवा रोखीने ग्रामपंचायत निधीत जमा करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे निधी जमा न करणे तसेच शाळा साहित्याचा लिलावासाठी आवश्यक त्या प्रमाणात प्रसिद्धी न दिल्याने लिलावधारक हजर नसताना एकच लिलावधारकास साहित्य विकल्याने ग्रामपंचायतीस स्पर्धात्मक दराचा लाभ न मिळाल्याने ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणे.
४) जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम पाडल्यानंतर त्यात निघालेल्या जुन्या साहित्याचा नोंद साठा नोंदवहीत घेणे आवश्यक असताना साठा नोंदवहीत न ठेवता साहित्याचा लिलाव करणे तसेच बांधकाम पाडल्या नंतर सदर साहित्याचा गैरव्यवहार करणे. या सर्व वरील बाबी निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद जिल्हा सेवा( शिस्त व अपील) नियम १९६७चाभंग केल्याने व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा( शिस्त व अपील) नियम(१९६४) चे नियम (३) मधील तरतुदीनुसार ग्रामसेवक डी के गिरी यांना पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.