पुणे चिंचवड:-महागाईचे अच्छे दिन’ आणणाऱ्यांना घरी बसवा – अजित पवार.
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
‘महागाईचे अच्छे दिन’ आणणाऱ्यांना घरी बसवा – अजित पवार.
चिंचवड, दि. 24 (शफिक शेख) – शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रत्येक गद्दार पराभूत झाले आहेत. शिवसेना पक्षाची चिन्हासकट चोरी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन राज्याचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
सांगवी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे, योगेश बहल, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, प्रदीप सपकाळ, देवेंद्र तायडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
* विकासकामांवर समोरासमोर चर्चेला या !
ना शास्तीकाराचा प्रश्न सुटला, ना अनधिकृत बांधकामाचा रेड झोनचा प्रश्न सुटला, उलट रावेत परिसरावर नव्याने रेडझोन वाढवला. गेल्या पाच वर्षात त्यांच्या भाजप सरकारने सत्तेवर असताना पालिकेच्या अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती विकास कामे केली याची समोरासमोर बसून चर्चा करावी, असे खुले आव्हान अजित पवार यांनी यावेळी दिले.
शहराचा नावलौकिक परत मिळवणार – नाना काटे
उमेदवार नाना काटे म्हणाले, मी याच विधानसभेत पिंपळे सौदागर विकासाचे मॉडेल उभारले आहे हे मायबाप जनतेला माहीत आहे. तोच विकास चिंचवड विधानसभा मतदारसंघात करण्यासाठी मी आपले नेते अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू ठेवणार आहे. पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, शिक्षण क्षेत्र, सोसायट्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबध्द आहे. मला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे. सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून आपल्या उद्योगनगरीचा नावलौकीक परत मिळवू, असे काटे यांनी सांगितले.