मायणी :-मायणीत सद्गुरु सरूताईंचा दहावा पुण्यस्मरण सोहळा.
प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
मायणीत सद्गुरु सरूताईंचा दहावा पुण्यस्मरण सोहळा
मायणी प्रतिनिधी___मायणी येथील संत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊलींचा दहावा पुण्यस्मरण सोहळा रविवार 11 सप्टेंबर पासून सुरू झाला असून 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रवींद्र शेठ बाबर यांनी दिली रविवारपासून सुरूताई माऊलीचा सरुताई लिला अमृत ग्रंथाचे पारायण सोहळा सुरू झाला असून या सोहळ्यात पहाटे पाच वाजता माऊलींची पाद्यपूजा व अभिषेक सात वाजता आरती नऊ वाजता नामस्मरण व आरती दहा वाजता सुरू ताई लिला मृत ग्रंथाचे पारायण दुपारी बारा वाजता आरती दुपारी एक ते तीन महिला भजन मंडळ साधना सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सहा ते सात हरिपाठ सात ते आठ नामस्मरण नऊ ते अकरा कीर्तन असे कार्यक्रम असून व्यासपीठ चालक ह भ प माणिक महाराज पाचवडकर आहेत सोहळ्याचे मार्गदर्शक ह भ प पांडुरंग लोहार गुरुजी आहेत 15 सप्टेंबर रोजी पहाटे दोन तीस ते चार तीस यावेळी फुलांची कीर्तन होणार आहे फुलांची वेळ चार 32 असून पहाटे पाच ते साडेसहा ओम चिले महाराज भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी अकरा वाजता ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव येळगावकर सौ उर्मिला येळगावकर यांच्या उपस्थितीत रथ सोहळा प्रारंभ होणार आहे तरी भाविक भक्तांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आव्हान सचिव रवींद्र शेठ बाबर यांनी केले आहे.