सिल्लोड :- शिवना येथील मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापकाविना व्यवहार ठप्प.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401.
सिल्लोड :- शिवना येथील मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापकाविना व्यवहार ठप्प.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शिवना (ता. सिल्लोड) येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत गेल्या पंधरवड्यापासून व्यवस्थापकच नसल्याने ग्राहकांची कामे खोळंबली आहेत.
या शाखेत शिक्षकांचा पगार, संजय निराधार योजनेचे वृद्ध लाभार्थी, शेतकरी, अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिकांची खाती असल्याने मोठा आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. बैंकेत हेलपाटे मारणाऱ्या ग्रहकाना सदर कर्मचारी शाखा व्यवस्थापक नसल्याचे कारण सांगून टोलवून लावत आहेत. व्यवहारच बंद झाल्याने बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांची कामे ही ठप्प झाली आहेत. अनेकांचे धनादेश बँकेत पडून आहेत. आरटीजीएस, एनएफटी सारखी मनी ट्रांसफरची कामे खोळबली आहेत. या शाखेत व्यवस्थापकाची लवकरात लवकर नियुक्ति करावी अशी ग्रामस्थानची मागणी आहे.
…
सोमवारी व्यवस्था करतो: शिंदे
यासंदर्भात विभागीय व्यवस्थापक श्री. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते येत्या सोमवारी बँकेला व्यवस्थापक देतो असे म्हणाले.