खटाव:-मायणी कृषी मंडलाधिकारी यांच्याकडून रब्बी पिक पाहणी व मार्गदर्शन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी कृषी मंडलाधिकारी यांच्याकडून रब्बी पिक पाहणी व मार्गदर्शन.
मायणी प्रतिनिधी__मायणी कृषी मंडल अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मायणी येथील गट नंबर 21 20 मध्ये ज्वारी व खोडवा ऊस या पिकांची पाहणी करून येथील शेतकरी शिवलिंग बागडे व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले अधिक माहिती देताना कृषी मंडल अधिकारी एम एन जाधव यांनी सांगितले की पूर्व मशागत, अंतर मशागत, ज्वारीवरील लष्कर आळी, व कानी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना कशी करावी याचेही मार्गदर्शन केले तसेच हरभऱ्यावरील घाटी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा याविषयी मार्गदर्शन केले. बीज प्रक्रिया एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती दिली तसेच खोडवा ऊस जतन आणि संगोपन कसे करावे याचेही मार्गदर्शन केले या पाहणी कार्यक्रमास पर्यवेक्षक एस एन माने, कृषी सहाय्यक बी. ए सरगर टी. बी चव्हाण पडळ यांची सावंत कान्हेरवाडी एन एस मुळीक धोंडेवाडी तसेच संजय गोटूकडे , दिलीप पुस्तके, गौरीहार श्रीखंडे, गोरख गाडगे, शशिकांत बागडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते