आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-डॉ. शरद दुधात याना राज्यस्तरीय सहित्यसेवा पुरस्कार
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव(वार्ताहर):-प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शरद दुधाट यांना नुकतेच राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
टाकळीभान तालुका श्रीरामपूर येथे नुकतेच ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद सबनीस उपस्थित होते. तर प्रमुख उद्घाटक म्हणून कवी आमदार लहुजी कानडे उपस्थित होते. यावेळी प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शरद दुधाट यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्यसेवा पुरस्काराने आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. वंदना मुरकुटे, डॉ. बाबुराव उपाध्ये, कविवर्य गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉ. शिरीष लांडगे पाटील, डॉ. अविनाश सांगोलकर, कवयित्री प्राचार्या अश्विनी तडेगावकर, ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, संदीप पटारे, ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख, पोपटराव पटारे, बापूसाहेब पटारे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, डॉ. संदीप घोडे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. बाबासाहेब शेंडगे, कवयित्री संगीता फासाटे, निवेदक प्रसन्न धुमाळ, आदिनाथ जोशी यांच्यासह असंख्य कवी, अध्यापक व रसिक उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथ घोगरे पाटील, प्राचार्य नानासाहेब शेळके, मुख्याध्यापिका श्रीमती ज्वाला कांबळे, पर्यवेक्षक देवराम वडीतके, ज्ञानदेव माळी आदींसह शिक्षक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.