क्रीडा (दिल्ली):- बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 जडेजाच्या फिरकी पुढे ऑस्ट्रेलियाची पडझड ,दुसऱ्या कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय.
प्रतिनिधी सागर पिसाळ खटाव:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
क्रीडा (दिल्ली):- बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023
जडेजाच्या फिरकी पुढे ऑस्ट्रेलियाची पडझड ,दुसऱ्या कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय.
दिल्ली येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीमुळे भारताने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला
पहिल्या डावात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया 263 व भारत 262 धावा करून दुसऱ्या डावाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने एका धावेची आघाडी घेऊन केली सलामी चांगली देऊनही सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जडेजाच्या 7 विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 113 धावावरच गारद झाला.
भारताने 114 धावांचे आव्हान चार गाड्यांच्या मोबदल्यात सहज पार करून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. सामन्यात दहा बळी घेणारा रवींद्र जडेजा सामनाविराचा मानकरी ठरला.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)