सातारा:-नागठाणे येथील प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल नागठाणे ता.जि. सातारा या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण2022-23 सोहळा मातोश्री हॉल नागठाणे येथे उत्साह संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी विविध खेळात कलागुणात शालेय. जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धेत मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये पार्थ जाधव व यशश्री बागल यांनी तयार केलेल्या उपकरणाचा द्वितीय क्रमांक आला असून या उपक्रमाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल श्री चौंडेश्वरी शिक्षण व सामाजिक संस्था नागठाणे या संस्थेची शाळा असून येथे केजी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिकत असून इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होत असतात संचालक मंडळाचे शाळेसाठी नेहमी चांगले सहकार्य असते या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित साळुंखे सर आपले मनोगत व्यक्त करताना सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शाळा बारावीपर्यंत करण्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक .अधीक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली ज्येष्ठ कर्मचारी मोहिते मावशी यांचा ही सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन श्री दीपक उत्तेकर करूणा उत्तेकर अजित साळुंखे (सचिव) तसेच व्हाईस चेअरमन डॉक्टर दीपक निकम खजिनदार अरुण राजे दीपक जाधव राजेंद्र माने अँड विजय यादव दत्तात्रय यादव दत्तात्रय कुलकर्णी सौ अरुणा जाधव हे सर्व संचालक उपस्थित होते तसेच सर्व पालक ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते