पुणे पिंपरी:-भाजपच्या माजी नगरसेवक, पदाधिका-यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – अजित पवार.
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
भाजपच्या माजी नगरसेवक, पदाधिका-यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – अजित पवार
पिंपरी, दि. 19 (शफिक शेख) :- भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून त्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला खिंडार पाडत अजित पवार यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना 440 व्होल्टचा आज (दि. १८) झटका दिला. चिंचवडची निवडणूक ही भावनिकतेवर नव्हे तर विकासकांच्या जोरावर जिंकू, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांसह शहर भाजपच्या धोरणांचा आणि भ्रष्ट कारभाराचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या सभेतच माजी नगरसेवक तुषार कामठे, विजय सुतार, माजी नगरसेविका विजयाताई सुतार यांच्यासह प्रसाद कांबळे, राजन नायर, संजिवनी जगताप, रोहित मुणगेकर, मिलिंद कांबळे, आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीसोबत विकास वाटेवर चालण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या कारभाराचा अक्षरश: पंचनामा केला. महापुरुषांचा अपमान, राज्याबाहेर गेलेले मोठे प्रकल्प, वाढती बेरोजगारी, महागाई, राज्यात सरकार असंविधानिक पद्धतीने आलेले सरकार, तोडफोडीचं आणि खोक्यांचे राजकारण, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष यासह जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांना हात घालत अजितदादांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.
गद्दार कोण?
ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदे दिली. सन्मान दिला, घरात जागा दिली, त्यांनी त्याच घरात चोरी केली आणि जाताना घराची पाटीही पळवून नेली. शिवसैनिकांनी रक्त ओकून वाढवलेली संघटना भाजपाच्या दावणीला कोणी बांधली. निवडणूक आयोगाचा कालचा निकाल काय सांगतो? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या निर्णयाला उध्दव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आव्हान निश्चित देतील, असा विश्वास व्यक्त करतानाच 50 खोके, एकदम ओके सगळ्यांनाच पटलं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार विलास लांडे, अतुल लोंढे, सुनील शेळके, विठ्ठल उर्फ नाना काटे, त्यांच्या पत्नी शीतल काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कविता आल्हाट, प्रशांत जगताप, कैलास कदम, सचिन भोसले, रविकांत वर्पे, निवृत्तीआण्णा बांदल, संजोग वाघेरे, गोरक्ष लोखंडे, बाबुराव चांदेरे, गणेश खांडगे, प्रशांत शितोळे, सचिन खरात, जगदीश शेट्टी, सुलक्षणा शिलवंत, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, निलेश पांढारकर, धनंजय भालेकर, सुजाता नांदगुडे, लताताई ओव्हाळ, सायली नढे, शाम जगताप, तानाजी जवळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.