नैसर्गिक अपंग विद्यार्थ्यांचे दहावीत उत्तुंग यश.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

नैसर्गिक अपंग विद्यार्थ्यांचे दहावीत उत्तुंग यश
पुणे, निगडी, दि. 30 जेऊ (शफिक शेख):- निसर्गाने दिलेल्या अपंगत्वाने खचून न जाता आणि आत्मविष्वासाची जिदृद कायम राखत रूपीनगरमधील कामगारांच्या वसाहतीमधील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील 4 दिव्यांग विद्याथ्र्यांनी प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या 2021-22 बोर्डाच्या परीक्षेत विषेश योग्यतेत उत्तीर्ण होवून दाखविले.
निगडी, रूपीनगर येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या ज्ञानदीप विद्यालयात शिकणा-या दहावीच्या 2021-22 बोर्डाच्या परीक्षेसाठी 256 विद्याथ्र्यांपैकी 4 विद्यार्थी हे दिव्यांग होते. यांपैकी कु.ऋचा दिपक चौधरी हिनेे 81.60 टक्के, चि. भोलेनाथ धनाजी गडसिंग याने 79.40 टक्के, अंकेत सचिन गेंड याने 56.80 आणि ओंकार विश्वनाथ येवले याने 69 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
वरील सर्व्र विद्यार्थी हेेे असाध्य आणि दुर्धर आजाराने पिडीत असून नैसर्गिकरित्या अपंगत्व आलेल्या या मुलांनी खचून न जाता त्यांचे पालक, त्यांचे वर्गशिक्षक, प्राचार्य सुबोध दगडू गलांडे आणि संस्थेचे सचिव श्री. शांताराम दगडू भालेकर यांच्या सहकार्याने हे अगाध यश प्राप्त केले आहे.
वरील सर्व विद्यार्थी हे अत्यंत गरीब आणि कामगार कुटुंबातील असून त्यांना आर्थिक आणि मानसिक मदत व सहकार्याची गरज असल्याने समाजातील संपन्न व्यक्तींनी त्यांना मदत करण्याची आज गरज आहे.