आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे श्री. जीवन पवार , संस्थापक,स्पर्धा मार्गदर्शन केंद्र कराड यांचे स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
  पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे श्री. जीवन पवार , संस्थापक,स्पर्धा मार्गदर्शन केंद्र कराड यांचे स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन.

आज आमच्या आश्रमशाळेत श्री गाडगे महाराज व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफले. कार्यक्रमाची सुरुवात निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने झाली.

विद्यार्थीनींनी गायलेल्या संदेशगीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कराड येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक मा.श्री. जीवन पवार सरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना एम. पी. एस.सी, यु.पी. एस.सी यासारख्या विविध स्पर्धा परीक्षा यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि संयम हाच यशाचा मूलमंत्र आहे. ध्येय ठेवा आणि त्यासाठी कार्यरत रहा , यश तुमचेच आहे. असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते मॅडम होत्या. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धापरीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर अभ्यास करण्याची सवय ठेवावी असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक महेशकुमार बोभाटे यांनी केले.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, कु. सायली चवडीमणी आणि कु. सेजल बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश घोलप सर यांनी केले आणि आभार श्रीमती सरिता सावंत यांनी मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button