वाई:-जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती गरजेची- श्री बरकडे.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1)जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती गरजेची- श्री बरकडे.

आजकाल रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वाढलेला बेसुमार वापर पाहता आपल्या शेतीची सुपीकता पुढील पिढीला टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय नैसर्गिक मिशन या अभियानात सहभागी होऊन आपली जमीन व त्यातील पिके ही विषमुक्त करावीत असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वाई श्री संतोष कुमार बरकडे यांनी केले.राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दरेवाडी येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील डॉ. भूषण यादगिरवार सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या जैविक निविष्ठा जसे की जीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र तयार कसे करावे,त्याचा वापर कसा करावा व त्याचे फायदे काय याविषयी सखोल माहिती दिली
तालुका कृषी अधिकारी श्री हरिश्चंद्र धुमाळ यांनी यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री रवींद्र बेलदार यांनी उपस्थित शेतकरी यांना कृषी विभागाच्या महाविस्तार ॲप विषयी माहिती दिली व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना या ॲप्लिकेशनचा लाभ घेण्यास सांगितले.
यावेळी जीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र तयार कसे करावे याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप कृषी अधिकारी श्री निखिल मोरे व आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रशांत सोनावणे यांनी केले. कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी वाई अधिनस्त सर्व कर्मचारी वर्ग, सीआरपी शुभांगी यादव, कृषी सखी सोनाली शिंदे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2)सौ.मानसी मोडक यांनी साकारलेली रेणुकामातेची प्रतिमा.

वाई दि ३० :- नवरात्रोत्सवानिमित्त रविवार पेठेतील देशपांडे वाड्यात सौ मानसी अतुल मोडक यांनी रांगोळीच्या साह्याने रेणुका माता देवीची प्रतिकृती रेखाटली. ती पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी गर्दी केली होती.सौ मोडक या गेले चार-पाच वर्षापासून नवरात्र देवीच्या रांगोळी काढतात. हा छंद जोपासताना त्यांनी श्रद्धाही जपली आहे .त्यांना लहानपणापासूनच रांगोळीची खूप आवड आहे. ही रांगोळीची देणगी त्यांना आजी कडून मिळाली असुन ही रांगोळीची कला पुढे त्यांनी चालू ठेवली .देवीची रांगोळी रेखाटताना माझ्या घरातील सर्व मंडळी मला मदत करतात. देवीची नवरात्रात काढलेली रांगोळी लक्ष्मीपूजणापर्यंत तशीच जपून ठेवतात.संपर्कासाठी 9921726428.




