राहता:-नांदूर्खी बु.गावात ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे पथदिव्याचां बट्याबोळ.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
नांदूर्खी बु.गावात ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे पथदिव्याचां बट्याबोळ
राहाता तालुक्यातील नांदूर्खी बु.गावात खूप दिवसापासून खूप स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहेत,काही चोरी गेलेले आहेत,तर काही ग्रामपंचायतने बंद पडलेले स्ट्रीट लाईट दुरुस्ती करण्यासाठी खोलून घेऊन गेलेले आहेत.काही लाईट तर दिवाळीला दुरुस्तीसाठी नेलेले आहेत.पण आजपर्यंत त्या लाईटचा पत्ता लोकांना लागेना.एक तर रात्री बिबट्याची दहशत त्यात बंद पडलेले लाईटचा पत्ता नाही.लोक खूप दिवसापासून एक तर मोकळे खांब ग्रामपंचायतने खोलून घेऊन् जावे किव्हा त्यावर लाईट बसवून लोकांची रात्रीची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी ग्रामपंचायतला करत आहेत.पण अजून काही ग्रामपंचायतला मुहूर्त मिळेना.ग्रामपंचायतने लवकरात लवकर खोलून घेऊन गेलेल्या लाईटचे काय वाट लावली हे लोकांना सांगावे.किव्हा लवकरात लवकर बसवून गैरसोय तरी टाळावी अशी ग्रामस्थ ग्रामपंचायतीस मागणी करत आहेत.लोकांच्या व गावच्या हिताचा लवकरात लवकर विचार करून ग्रामपंचायतने योग्य पावले उचलावित.नाहीतर आम्ही नागरिक ग्रामपंचायतीला हार घालून ग्रामपंचायतीचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाहीत.त्यामुळे लवकरात लवकर योग्य पावले उचलावित..