राहता:-पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या झालेल्या निर्घृण हत्याचे शिर्डी येथे निषेध करून पत्रकारानी दिले प्रांत अधिकारी यांना निवेदन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव( वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले,खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसिल, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून
या घटनेचा निषेध करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत शासनाकडून मिळावी या संदर्भाचे निवेदन राहाता तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी शिर्डी प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी गोविंद शिंदे साहेब यांना या घटने संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीपराव खरात, राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, राहता मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार जाधव, उपाध्यक्ष विजय बोडखे, पत्रकार पंढरीनाथ पगार,रवींद्र भालेराव प्रशांत काळे, चंद्रशेखर जगताप, दिलीपराव धावणे सतिश वैजापूरकर, सिताराम चांडे,डिजिटल मिडीया जिल्हाध्यक्ष-प्रशांत शर्मा,
कोंडीराम नेहे. प्रमोद कुंभकर्ण .सुभाष कोंडेकर .दादासाहेब म्हस्के. कैलास विखे लखन गव्हाणे .संजय कोळसे. सुहास वैद्य नवनाथ दिघे. साहेबराव चोखर. प्रवीण बेंद्रे परेश कापसे साईप्रसाद कुंभकर्ण .रवींद्र काकडे .अनिल बेंद्रे प्रकाश औताडे. तरकसे कैलास घोरपडे .यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
.या वेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खरात यांनी या घटनेविषयी निषेध नोंदवून पत्रकारांच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत