आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रहिमतपूर:-रहिमतपूर:- नेहरू युवा केंद्र सातारा कार्यालय मार्फत डॉ. वसंतदादा पाटील जुनियर कॉलेज रहिमतपूर येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी मारुती सोमुत्ते कराड:-7071201101

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

रहिमतपूर:- नेहरू युवा केंद्र सातारा कार्यालय मार्फत डॉ. वसंतदादा पाटील जुनियर कॉलेज रहिमतपूर येथे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी करियर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी
श्री रामदास निकम (प्रभारी प्राचार्य डॉ.वसंतदादा पाटील जुनियर कॉलेज रहिमतपूर),
.सौ मधुमती माने, श्री विकास साबळे,श्री आर पी राऊत ,श्री रमेश पुजारी प्रतिनिधी (नेहरू युवा केंद्र सातारा) इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. करिअर मार्गदर्शन शिबिर हे रहिमतपूर नगर येथील युवक व युवतीसाठी आयोजित केले होते. यामध्ये नुकतेच बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असणाऱ विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने परिश्रम घ्यावे यासाठी विद्यार्थ्यांना कानमंत्राच्या स्वरूपात श्री निकम सर यांनी मार्गदर्शन केले.  तसेच वय वर्ष हे सोहळा हे धोक्याचे असते ह्याच वयात विद्यार्थ्यांनी करिअर घडवायचे असे मुलाना संदेश दिले, व तसेच श्री गाढवे सर यांनी मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त मुलांनी एमपीएससी व यूपीएससी यासारख्या शासकीय अभ्यासक्रमाचा अभ्यास करून शासकीय सेवेत यावे असे आवाहन केले. व तसेच अनेक मान्यवरांनी प्रेमात पूर्ण नगरीतील उपस्थित युवक युवतींना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अमर लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button