वाई:-सिद्धनाथवाडी येथे स्वच्छता मोहिम.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दिनांक 18/05/2025
वाई:-सिद्धनाथवाडी येथे स्वच्छता मोहिम.
सिद्धनाथवाडी येथील श्री. जयवंत भाऊ कचरे यांची ओढ्याच्या स्वच्छतेविषयी तक्रार आज प्राप्त झाली असता. त्यानुसार, नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक मा. विजय मरोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ओढ्याची तत्काळ साफसफाई करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना या ठिकाणच्या दुर्गंधी व घाणीमुळे त्रास होत होता, अशी तक्रार जयवंत भाऊ व त्यांच्या परिवाराने शिवसेना विधानसभा अध्यक्ष मा. योगेश आनंदराव फाळके साहेब यांच्याकडे केली होती.
फाळके साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता, स्वतः लक्ष घालून नगरपालिका आरोग्य विभागाशी चर्चा करून तत्काळ साफसफाईचं काम पूर्ण केलं.
नगरपालिका व आरोग्य निरीक्षक मा. विजय मारुडा साहेब यांचे विशेष आभार!
हाच आहे लोकसेवेचा खरा अर्थ – तत्काळ निर्णय, तातडीची अंमलबजावणी!
वाई तालुक्यातील जर अशीच काही कामे रखडली असतील तर योगेश फाळके यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.