आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-विद्यार्थ्यांनी अनुभवली प्रत्यक्ष शेअर बाजाराची खरेदी विक्री.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

विद्यार्थ्यांनी अनुभवली प्रत्यक्ष शेअर बाजाराची खरेदी विक्री
फलटण :
श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेअर बाजाराच्या खरेदी विक्रीचा अनुभव घेतला.
इयत्ता बारावी अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात भांडवल बाजारामध्ये शेअर बाजाराचा अभ्यास आहे. याचा आधार घेऊन अर्थशास्त्राचे शिक्षक सतीश जंगम यांनी विद्यार्थ्यांना शेअर बाजाराचे प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. यावेळी शेअर बाजारचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार अमोल कुंभार, प्राचार्य रणदेव खराडे प्रा. रवींद्र कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेअर बाजारचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार अमोल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शेअर बाजार, त्याचे प्रकार, आयपीओ, व शेअर बाजारातील कंपन्यांची माहिती गोळा करण्याची पद्धत, कंपन्यांचा नफा तोटा, खर्च, भांडवली गुंतवणूक, कर्ज आणि लाभांश देण्याची पद्धत याची माहिती देऊन पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना शालेय वयातच शेअर बाजाराचे ज्ञान मिळाल्यास सध्याच्या नागरिकांची शेअर बाजाराच्या नावाखाली होत असलेली फसवणूक भविष्यात टाळता येईल.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शेअर बाजाराचा अभ्यास करून स्वतः पैसे गुंतवल्यास त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकांनी साक्षर होण्याबरोबरच अर्थ साक्षर होणे गरजेचे आहे असे सांगितले. शेअर बाजाराची माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑनलाइन शेअरची खरेदी विक्री करून दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
प्रास्ताविकात अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा. सतीश जंगम यांनी अर्थशास्त्र हा विषय प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे. सध्या भारतातील नागरिक शेअर बाजार मध्ये पैसे गुंतवण्यासाठी इच्छुक असून त्यांना ज्ञान नसल्याने त्याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत व नागरिक फसत आहेत असे सांगून इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातील भांडवल बाजारांचा अभ्यास यामध्ये शेअर बाजाराची माहिती असल्याने हा उपक्रम आयोजित केला असून यापूर्वीच प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर बाजाराची माहिती संकलित केली असल्याचे सांगितले.
प्रा. रवींद्र कोकरे यांनी स्वागत केले. कु. सारिका घोलप, सिद्धार्थ टकले दामिनी ठिगळे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ – विद्यार्थ्यांना शेअर बाजाराचे प्रत्यक्ष अनुभव अमोल कुंभार शेजारी प्रा सतीश जंगम

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button