औरंगाबादः-लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरूणाची आत्महत्या
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबाद लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या महिलेस तुला जो भेटला असेल त्याच्या सोबत तु खुश रहा,अशी चिट्ठी लिहुन तरूणाने गळफास घेतला.ही घटना शनिवारी बालाजी नगर येथे घडली आहे.मुकेश नागोराव गंवादें वय 30 रा.चौवडी टाकळेश्वर जि. बुलढाणा असे मृताचे नाव आहे .पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार मुकेश पदव्युतर शिक्षण घेत होता. सोबतच केटरींग चे ही काम करत होता. एका महिले सोबत त्याची ओळख काही महीण्यापुर्वी झाली होती.काही महीन्या पासुन ते दोघे बालाजी नगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.शनिवारी सकाळी मुकेश याने राहत्या खोलीत गळफास घेउन आत्महत्या केली .महीला सकाळी झोपेतुन उठली असता मुकेशने गळफास घेतल्याचे दिसले.महिलेने ही घटना पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली .मृतदेह घाटी शवगारात ठेवला असुन नातेवाइक आल्यावर शवविच्छेदन होणार आहे.