ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न

प्रतिनिधि:- रफीक शेख पुणे

प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकिय कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न

पुणे, दि. 12 (रफिक शेख ) : प्रहार दिव्यांग शासकिय-निमशासकिय कर्मचारी व अधिकारी संघटनेची सर्वसाधारण सभा राष्ट्रसेवा दलाचे निळू फुले सभागृह, सिंहगड रोड, पुणे येथे संपन्न झाली.

यावेळी सदर सर्वसाधारण वार्षिक सभेस मा. राज्याध्यक्ष रविंद्र सोनवणे, राज्य सचिव, व राज्य कार्यकारणी, तसेच महाराष्ट्रातील दिव्यांग सभासद, कर्मचारी, बधू – भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘न भुतो न भविष्यती’ अशी भावना ठेवून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्य़ातुन हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करून आपल्या न्याय हक्काबाबत काम करणाऱ्या एकमेव संघटनेचे सर्व सभासद हजर राहिले होते.

यावेळी सभेचा अजेंडा सादर करण्यात आला. 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सेवक व अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन चालू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय झाला आणि जिल्हाध्यक्षाची निवड सर्वानुमते करण्यात आली.

याप्रसंगी उत्कृष्ट कार्याबद्दल प्रहार दिव्यांग शासकीय – निमशासकिय कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मा. हरीष आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला.

हरीष आल्हाट यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण पुणे जिल्हा कार्यकारीणी , सभासद व सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट व नियोजनबद्ध केल्याने राज्य कार्यकारणीने विशेष कौतुक केले.

उपस्थित सर्व सेवक, अधिकाऱ्यांचे अध्यक्ष-हरीष आल्हाट यांनी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button