खबालवाडी:-प्राजक्ता गुजर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
प्राजक्ता गुजर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
खबालवाडी:- खबालवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्राजक्ता गुजर नियत वयोमानानुसार 31 ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्याचे औचित्य साधून केंद्रसमूह जायगाव च्या शिक्षण परिषदेत सेवानिवृत्ती चा कार्यक्रम संपन्न झाला. एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून परिसरात ओळख असणाऱ्या सौ. गुजर यांनी थोरवेवाडी औंध जायगाव शिवदेश्वर (पाटण) व खबालवाडी येथे 33 वर्षे ज्ञान दानाचे कार्य अतिशय उकृष्ट पद्धतीने केले. एक मितभाषी, आपल्या पेश्याशी प्रामाणिक राहून विद्यार्थी विकास हेच जिवनाचे ध्येय घेऊन सेवाकाळ पूर्ण केला असे गौरोवोदगार जायगाव केंद्राचे माजी केंद्रप्रमुख प्रताप पाटोळे यांनी या वेळी काढले. या वेळी केंद्रातील शिक्षकांनी सौ. गुजर यांच्याबद्दल विविध आठवणी ना उजाळा दिला. सौ. गुजर यांनी आपल्या सेवाकाळतील आठवणी घडलेले विद्यार्थी लाभलेले सहकारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दीपक गिरी, प्रकाश देशमुख आनंदराव साळुंखे, कमलाकर गुजरे, विकास यादव,संग्राम गोसावी, कविता घार्गे, नूतन देशमुख, सौ. वाडेकर, स्वाती शिंदे उपस्थित होते. केंद्रसंचालक मोरे यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.